Now casting
मराठी रहस्य-थरार नाटकासाठी कलाकारांची निवड | Casting Call
Rahul Ramchandra Pokharkar
- Male & Female
- Age 5–50 yrs

About this opportunity
Tossing Tales Motion Pictures प्रस्तुत आगामी दोन अंकी मराठी रहस्य-थरार नाटक ‘काळ्या दगडावरची रेघ’ साठी विविध प्रमुख भूमिकांकरिता कलाकारांची निवड सुरू आहे. अनुभवी तसेच नवोदित कलाकारांचे स्वागत आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व, उत्तम संवादफेक, प्रभावी अभिनय आणि रंगभूमीवर काम करण्याची आवड असलेल्या कलाकारांनी अर्ज करावा.
Requirements
स्त्री भूमिका: शिक्षिका (२८–३२): सुशिक्षित, संवेदनशील आणि गूढ व्यक्तिमत्त्व. आकर्षक विवाहित स्त्री (३०): भावनिक गुंतागुंत आणि रहस्यपूर्ण स्वभाव. महिला पोलीस अधिकारी (३०–३५): बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि प्रभावी व्यक्तिमत्त्व. पुरुष भूमिका: मुख्याध्यापक (४५–५५): विनोदी, बोलके आणि अनुभवी. सरपंच (५०–५५): प्रभावशाली, धूर्त आणि दबदबा असलेला. पोलीस कॉन्स्टेबल (४०–४५): मिश्कील, प्रसंगावधान राखणारा. गूढ स्वभावाचा तरुण (२८–३५): गंभीर, रहस्यमय व्यक्तिमत्त्व. शाळेचा शिपाई (४०–४५): साधा, विश्वासू, ग्रामीण स्वभाव. तरुण पुरुष (३२–३५): बुद्धिमान, आत्मविश्वासू आणि प्रभावी. बालकलाकार (८–१०): निरागस, निरीक्षणशील आणि सहज अभिनय करणारा. अर्ज करण्यासाठी इच्छुक कलाकारांनी खालील माहिती पाठवावी: नाव, वय आणि सध्याचे शहर अलीकडील फोटो व अभिनयाचा परिचय नाटकातील पूर्वानुभव (असल्यास) अभिनयाचा व्हिडिओ / शोरील संपर्क क्रमांक Email: [Removed by admin] WhatsApp (India): [Removed by admin] WhatsApp (Canada): [Removed by admin] प्रयोगशील आणि व्यावसायिक मराठी रंगभूमीवर काहीतरी वेगळं करू इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी ही संधी आहे.
Posted by
- Yes: Email Verified
- Yes: Mobile Verified
- Yes: Identity Verified
Interested in this role?
Apply with your mobile number. New here? Your free account takes a minute.
